
सेलू : जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद विभागात आज सेलू नगरपरिषदेच्या क्रॉप मेंबर पदासाठी विनोदराव बोराडे व अशोक नाना काकडे यांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल केले.
अर्ज भरल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी मा. रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांची सदिच्छा भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.

यावेळी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद दादा सावंत, गटनेते साईराज बोराडे, शहराध्यक्ष अशोक शेलार, युवा तालुकाध्यक्ष संदीप घुगे, प्रभाकरजी वाघीकर, मयूर वाघ तसेच प्रतीक बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या अर्ज प्रक्रियेमुळे सेलू नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला वेग येणार असून आगामी काळात राजकीय हालचालींना चालना मिळण्याची शक्यता आहे.
