
सेलू दि ११ रविवार रोजी शहरातील साईबाबा मंदीर मधील सभागृहात
जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने ४ जानेवारी १८ जानेवारी २०२६ जीवनदान महाकुंभ २०२६ आयोजित करण्यात आले या मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभा व्दारे रुग्नांन विनामुल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थान तर्फे राबविला जात आहे या रक्तदान शिबीरात ५९ रक्तदात्यांनी रक्तरान केले

शिबीराचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनीष कदम नगरसेवक गणेश सवणे नगरसेवक मिलिंद पवार नगरसेवक विनोद धापसे डॉ. अनुराग जोगदंड, सामाजिक कार्यकर्ता सुनील गायकवाड पत्रकार सतीश आकात सोशल मीडिया तसेच सुरेश मोरे व्यवस्थापक उपपीठ मराठवाडा, प्रमुख मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी संप्रदायाचे कार्यकर्ते तालुकाप्रमुख प्रकाश मोरे माजी जिल्हाध्यक्ष डक नाना माजी, बालासाहेब लिपणे, सचिव बाबासाहेब टाके माजी तालुका अध्यक्ष संजय जाधव माझी महिलाजिल्हा अध्यक्ष निर्मला लिपणे जनगणना प्रमुख कृष्णा घरडे प्रसिद्धीप्रमुख प्रल्हाद कारके युवाप्रमुख दीपक चव्हाण तालुका महिला अध्यक्ष कदम टाक , शिंदे ,तालुका माजी महिला अध्यक्ष ईगोले ,वंदना टाक सर्व संप्रदायातील सेवेकरी सर्वांच्या उपस्थितीत याप्रसंगी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९ रक्तदान कुपिका संकलित करण्यात आल्या सर्वांच्या सहका र्यातुन कार्यक्रम यशवी झाला.