सेलू येथे दर्पण दिनानिमित्त गुणगौरव सोहळा;

सेलूत ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा केला सन्मान

सेलू, ता. 7 (प्रतिनिधी) :
अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून विशेष गुणगौरव सोहळा मंगळवारी दि. ६ सकाळी आयोजित करण्यात आला होता.

शहराचे ग्रामदैवत बाबासाहेब महाराज मंदिरा जवळील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस व लोकमान्य टिळक पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलिंद सावंत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम, पालिकेचे गटनेते साईराज बोराडे, नगरसेवक अन्वर पठाण, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे उपस्थित होते. यावेळी
पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, कांचन कोरडे, राम सोनवणे, सय्यद ईसाक, आणि ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता घराघरांत वृत्तपत्र पोहोचवणारे विक्रेते जयचंद खोना, राम सोनवणे यांचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस मोहम्मद ईलियास यांनी केले. सूत्रसंचलन सचिव शेख मोहसीन यांनी केले, तर आभार रामेश्वर बहिरट यांनी मानले. दर्पण दिनानिमित्त आयोजित या गौरव सोहळ्यासाठी जिल्हा सरचिटणीस मोहम्मद ईलियास अध्यक्ष लक्ष्मण बागल, कार्याध्यक्ष संजय मुंढे, सचिव शेख मोहसीन, यांच्यासह संघाचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पुढाकार घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button