
जिंतूर/सेलू : मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या “हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी यांसारख्या अनावश्यक खर्चाऐवजी जनहितासाठी योगदान द्या” या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत जिंतूर-सेलू मतदारसंघातील सर्व बोर्डीकर प्रेमी, आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र येत जमा केलेली २२ लाख रुपयांची रक्कम आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आली.
नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला. यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, प्रभाकर दादा वाघीकर, सुनील भोंबे, अभिजित पारवे, गजानन बोर्डीकर, नामदेव काका आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.