उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पहिल्या दिवशी 0(शून्य) तर दुसऱ्या दिवशी 4(चार) ऑनलाईन अर्ज प्राप्त.

सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 — अर्ज भरण्याचा दुसरा दिवस संपत आला तरी उमेदवारांचा प्रतिसाद कमी

सेलू | येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

नगरअध्यक्ष पदासाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2025 व 11 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2.40 वाजेपर्यंत एकही अर्ज प्राप्त झालेला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
तर नगरसेवक पदासाठी पहिल्या दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी एकही अर्ज दाखल झाला नव्हता, मात्र आज 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.40 वाजेपर्यंत एकूण 4 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा अद्याप न केल्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत आता थोडीच शिल्लक असताना, पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सेलू शहरात राजकीय चर्चांना ऊत — कोणाला जाहीर होणार उमेदवारी तर कोण ठरेल नगराध्यक्ष पदाचा दावेदार?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय चर्चांना वेग आला असून, प्रमुख पक्षांच्या बैठका आणि हालचालींमुळे सेलूच्या राजकारणात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रमुख पक्षाने अध्यापही त्यांच्या उमेदवारांची नावे घोषित केली नसून,केवळ दिवस पुढे ढकलण्याचा काम राजकीय पक्षाचा वतीने होत आहे असे दिसून येत आहे.

एका राजकीय पक्षाची यादी जाहीर न झाल्यामुळे दुसरा राजकीय पक्ष नाराज उमेदवारांची य बंडखोरी होऊन मातब्बर नेत्यांची येण्याची शक्यता? या अंदाजाने वाट पाहत आहेत असे दिसून येत आहे!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button