
खवणे पिंपरी, ता. सेलू— दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी नेताजी सुभाष विद्यालय खवणे पिंपरी येथे सन 2000-2001 च्या दहावी बॅचतर्फे भव्य स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वर्गमित्र-मैत्रिणींनी पंचवीस वर्षांनंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच मा. सुभाष चव्हाण व मा. व्यंकटराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुवर्य रोडगे सर, तर उपाध्यक्षस्थानी जोशी सर होते. विशेष उपस्थितीत साडेगावकर सर, वैद्यकार सर, गजमल सर तसेच त्या काळातील शिपाई शिवाजी कोल्हे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या आनंदात भर टाकली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. वर्गात बसल्यावर “उशिरा का आलात?” असे विचारून सरांनी जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या. मात्र यावेळी छडीचा प्रसाद नव्हे, तर आनंदाचा वर्षाव झाला. जोशी सरांनी मार्गदर्शन करताना म्हटले, “आता तुम्ही आमचे विद्यार्थी नव्हे, तर आमचे मित्र आहात,” असे सांगून सर्वांना आपलेपणाचा दिलासा दिला.
रोडगे सरांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत जोक सांगून सर्वांना पुन्हा एकदा हसवले. साडेगावकर सर आणि वैद्यकार सर यांनी इंग्रजी व गणिताच्या आठवणींना उजाळा देत थोडेसे शिकवलेही!
या स्नेहसंमेलनात 2000-2001 च्या वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून सध्याच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि पुढेही एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याची ग्वाही दिली.
उपस्थित वर्गमित्र:
लहू घोडे (PSI), शिवाजी गायकवाड (युवा उद्योजक, शेंद्रा MIDC), कल्याण जाधव, गणेश गाते, नारायण गायकवाड, मुंजाभाऊ गायकवाड, सुभाष गायकवाड, विठ्ठल गायकवाड, उद्धव गायकवाड, संतोष गोरे, शरद चव्हाण, उद्धव चव्हाण, राजेभाऊ चव्हाण, काशिनाथ चव्हाण, भाऊराव खरात, भगवान गजमल, अनिस सय्यद, सतीश अवचार, मधुकर गणगे, नारायण फासाटे, हरिभाऊ गाते, जैनुद्दीन मोहम्मद.
वर्ग मैत्रिणी:
करुणा पिंपरीकर, उज्वला शेंडे, बेबीनंदा चव्हाण, वैशाली चव्हाण, रिमा चव्हाण, सुवर्णा चव्हाण, सविता चव्हाण, ज्योती गायकवाड, संगीता हिवाळे, नीता होके, लता चव्हाण, मंदाकिनी चव्हाण.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात, भावनिक वातावरणात आणि जुन्या आठवणींनी भारलेल्या क्षणांनी संपन्न झाला. सर्व उपस्थितांनी भविष्यातही अशा भेटी आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.