परभणीत माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळामाजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम..

परभणी : माजी मुख्यमंत्री मा. श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे मित्र मंडळ व नगरसेवक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय साडेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा सोहळा 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता राज लक्ष्मी लॉन्स, परभणी येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमास पालकमंत्री व राज्यमंत्री मा. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भुमरे, तालुका अध्यक्ष गणेशराव काटकर तसेच शहराध्यक्ष अशोक शेलार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या पक्षप्रवेशामुळे सेलू शहरातील राजकारणात नवीन समीकरण निर्माण झाली असून, अनेक कार्यकर्त्यांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button