निपाणी टाकळी येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाटर फिल्टर प्रकल्पाचे लोकार्पण..

सेलू (प्रतिनिधी): निपाणी टाकळी येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘वाटर फिल्टर’ या लोकोपयोगी प्रकल्पाचे लोकार्पण दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेशजी काटकर, नाना आवटे, अशोकजी ताठे, रणजीतजी मोरे, शिवाजीराव गजमल, माजी सरपंच दिगंबरराव गिराम, विद्यमान सरपंच सुनील सावंत तसेच लहानाप्पा हरकळ, विकास गिराम, शेख अहमद, भगवान सावंत, मंगेश ठाकरे, भगवान रासवे, लक्ष्मण चिंचाणे, दत्तराव हरकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button