माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा पुढाकार – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा…

यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यात अतिवृष्टीचे प्रचंड थैमान पाहायला मिळाले. सलग आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, जनावरांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी बांधवांना आपले सर्वस्व गमवावे लागले असून त्यांची आर्थिक कोंडी गंभीर स्वरूपाची झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाथरी–सेलू मतदारसंघाचे माजी आमदार श्री हरिभाऊ काका लहाने यांनी शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी संवेदनशील आणि प्रेरणादायी पाऊल उचलले. त्यांनी स्वेच्छेने आपल्या एका महिन्याच्या पेन्शनची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून शेतकरी पुनर्वसनात हातभार लावला.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये
मा.खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे,
मा.आ. अर्जुन खोतकर,
मा.श्री हेमंत पाटील,
श्री राजू कापसे,
श्री आनंद भरोसे,
श्री संदीप लहाने,
बाबा काटकर,
अविनाश शेरे
आणि सौ. सखुबाई लटपटे यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा स्वैच्छिक मदतीचा उपक्रम एक दिलासा देणारा आणि प्रेरणादायी संदेश ठरत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button