
सेलू ( प्रतिनिधी) सेलू येथील कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्ष 2022–23 मधील उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल महाराष्ट्र उद्योग विभाग आयोजित भव्य सोहळ्यात ताज पॅलेस, बांद्रा (मुंबई) येथे सुवर्ण पदक निर्यात उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा मान महाराष्ट्र राज्याचे , माननीय उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत, माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, माननीय उद्योग सचिव डॉ. पी. अंबालगन, तसेच माननीय उद्योग विकास आयुक्त श्री दिपेंद्र सिंह कुशवाहा आणि इतर अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
कंपनीतर्फे हा बहुमान संचालक श्री राम वल्लभ बाहेती आणि श्री महेश बाहेती यांनी विनम्रतेने स्वीकारला.
विशेष उल्लेखनीय म्हणजे हा सलग चौथा वर्ष आहे की कोहिनूर रोप्स प्रा. लि. यांना महाराष्ट्र शासनाकडून निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव मिळत आहे, ज्यामुळे त्यांचे भारताच्या औद्योगिक प्रगतीतील अग्रगण्य स्थान अधिक भक्कम झाले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने साई बाबा बँके च्या मुख्य कार्यालयात आज दिनांक 16/10/25 रोजी बँकेचे अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर यांच्या हस्ते श्री बाहेती नंदकिशोर,श्री रामवल्लभ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर, संचालक श्री प्रवीण बिनायके मु का अधिकारी श्री रामराव लाडाने,मुश्ताक भाई,विलास पौळ ची उपस्तिथी होती