सेलू नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षणाची यादी जाहीर…

सेलू – आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत प्रक्रिया दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सेलू येथील साई नाट्य मंदिरात अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली.

ही प्रक्रिया ईश्वरचिठ्ठी पद्धतीने घेण्यात आली. या पद्धतीसाठी लहान मुले पियूष रामेश्वर साबळे आणि अलविन अन्सार रंगरेज यांची निवड करण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य अधिकारी म्हणून अरुणा संगेवार यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सोबत तूकाराम कदम, सतिष रेड्डी, दत्ता गिनगिने, श्री. चव्हाण तसेच पालिका कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

सदर सोडतीत जाहीर झालेली प्रभागनिहाय आरक्षण यादी पुढीलप्रमाणे आहे —

या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, अनेक इच्छुक उमेदवार आता आपल्या प्रभागातील आरक्षणानुसार रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलामुळे अपेक्षित नेत्यांना निराशा, तर काहींना नवी संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.

सेलू नगरपरिषदेतील सत्ता समीकरणावर या आरक्षण यादीचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सेलू नगरपरिषद निवडणूक आरक्षण जाहीर, राजकारणात नवीन समीकरणे आकार घेताना दिसत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button