
पीडितेला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्रींकडे निवेदन..!

सेलू (ता. परभणी) : सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, पीडितेला न्याय मिळावा तसेच प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात यावी, या मागण्यांसाठी आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू असा मूक मोर्चा काढून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आरोपी संतोष मलसटवाड यांनी नाबालिग मुलीशी अनैतिक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गु. र. नं. 488/2025 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा शिक्षक असून त्याच्या कृत्यामुळे शिक्षणक्षेत्रावरही कलंक लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –
- या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.
- आरोपीला न्यायालयीन कोठडीत (Under Trial) ठेवून कठोर शिक्षा करण्यात यावी.
- घटनेचा तपास SIT मार्फत करण्यात यावा.
- पीडित मुलीच्या पुढील शिक्षणासाठी शासनाने आर्थिक मदत द्यावी.
- . सदरील प्रकरणात आणखी आरोपी फरार आहेत त्यास तात्काळ अटक करण्यात यावी
- . तसेच पिडितास व त्याच्या कुटुंबियास संरक्षण दण्यात यावे
सदर निवेदन सेलू तहसीलदार शिवाजी मगर यांना देण्यात आले व यांनी उपविभागीय अधिकारी सेलू कार्यालयात दाखल केले. या प्रकरणी स्थानिक नागरिक आणि समाजबांधवांनीही सदरील मागण्या तात्काळ मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी सेलू तील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते