
सेलू, दि. 03 :
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सेलू शहरात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समाजबांधवांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मिलींद सावंत, मारोती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरोसे, अशोक अंभोरे, राजेंद्र पवार, गौतम धापसे, बबन गायकवाड, संजय भाग्यवंत, प्रदीप जोहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.