
सेलू (ता.सेलू, जि.परभणी) – दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी रविवारच्या दिवशी सेलू येथील शासकीय विश्रामगृहात सेलू तालुका डिजिटल मिडिया तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीत खालील पदाधिकारी निवडण्यात आले –
➡️ तालुका अध्यक्ष – श्री. गणेश सवने
➡️ उपाध्यक्ष – श्री. संदीप वरकड
➡️ सचिव – श्री. निरज लोया
➡️ कार्याध्यक्ष – श्री. विठ्ठल राऊत
➡️ कोषाध्यक्ष – श्री. निशिकांत रोडगे
➡️ सहसचिव – श्री. दिपक जडे
➡️ समितीचे सल्लागार – श्री. सतीश आकात
सदस्य म्हणून महेश राऊत, वसंत आवटे, शरद शिंदे, शिवाजी पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, सुरज शहाणे आदींचा समावेश करण्यात आला.
यावेळी सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन अहमद मामु, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद ईलीयास, जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे, अबरार बेग, रेवनअप्पा साळेगावकर, निसार पठाण, झोल, असगर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
👉 नव्या कार्यकारिणीची घोषणा होताच उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले