
दिनांक 9 ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहानी नूतन प्राथमिक शाळा,सेलू प्रशालेत रक्षाबंधना निमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कब बुलबुल च्या मुलींनी वृक्षांना राखी बांधली.तसेच पोलीस स्टेशन, सेलू येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक श्री. पठाण, कॉन्स्टेबल श्री.बोराडे आदि पोलीस बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उल्हास पांडे व ज्येष्ठ शिक्षक श्री. एकनाथ जाधव सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी कब मास्टर श्री. धनंजय महामुनी व फ्लॉग लीडर सौ. कुंभार रामकोर, सौ. सोनाली कुबरे उपस्थित होते.प्रशालेत रक्षाबंधन या सणावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या हस्तकलेतून तिरंगा राख्या बनवण्यात आल्या. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उल्हास पांडे व ज्येष्ठ शिक्षिका सौ.सविता डाफने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शेळके शितल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले.
