
सेलू उपविभागीय अधिकारी म्हणून शैलेश लाहोटी यांनी गुरुवार ३० जुलै रोजी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला आहे. यावेळी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर ,तलाठी संघटनेचे पदाधिकारी मुकुंद आष्टीकर सह इतरांनी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांचे स्वागत केले आहे. आहे.वैयक्तिक त्यांची कामगिरी चांगली असली तरी कारकीर्द मात्र गाजतच गेली आहे.एका वर्षाच्या कालावधीत त्यांची बदली, शक्तीची रजा, आणि ‘मॅट’ने त्यांना दिलेला न्याया बरोबरच प्रशासनाने त्यांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेत त्यांचे येथे राहणे नको असलेल्यांना न्याय दिला आहे. अशी चर्चा उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्या बदलीनंतर सेलू आणि जिंतूर कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरात होत आहे. २९ जुलै रोजी शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी उपजिल्हा संवर्गातील प्रशासकीय कारणास्तव जालना येथील पुनर्वसन अधिकारी शैलेश लाहोटी यांची सेलूचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदस्थापना केली आहे. शैलेश लाहोटी यांनी आपल्या पदाचा ३० जुलै रोजी दुपारी पदभार हाती घेतला आहे .यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. पाथरी उपविभागाचा त्यांचा दांडगा अनुभव निश्चितच त्यांना सेलुसाठी फलदायी ठरेल ऐवढीच त्यांच्या आगमनानिमित्त शुभेच्छा देऊन अपेक्षा व्यक्त करुया.
