श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये आज नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण, नागपंचमी हा नाग देव शेषनागच्या सन्मानार्थ पवित्र श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागाची पूजा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि या सणाला घरोघरी मातीपासून बनवलेल्या नागाची पूजा केली जाते. त्याप्रमाणे आज शाळेतही माती पासून बनविलेल्या नागदेवतेची पूजा करण्यात आली तसेच छोट्या चिमुकल्यांनी आज सणाच्या निमित्ताने खूप आनंद घेतला.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. संजय रोडगे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर मॅडम व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.