
दि. 23.07.2025 रोजी सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, सेलू. येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली… सभेच्या अध्यक्षस्थानी श्री.मकरंदजी दिग्रसकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती श्री. डॉ.सत्यनारायणजी लोया, डॉ. प्रा. विनायकराव कोठेकर, श्री.
दत्तरावजी पावडे, श्री. सुखानंद बेंडसुरे, श्री. उल्हास पांडे उपस्थित होते..बहुसंख्य पालक या सभेस उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बेंडसुरे सुखानंद यांनी केले.. गतवर्षीच्या पालक शिक्षक संघाचे अहवाल वाचन श्री.अमोल हळणे यांनी केले. गीतमंचच्या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागत गीत सादर केले या विद्यार्थिनींना मार्गदर्शन सौ.डोळस रेखा यांनी केले.. सूत्रसंचलन सौ.कुबरे सोनाली तर आभार प्रदर्शन सौ.संपदा जहागीरदार यांनी केले.यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.नवनिर्वाचित पालक शिक्षक सदस्यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी सौ.वर्षा इंगोले यांची निवड करण्यात आली.या सभेस सर्व सहकारी मित्र यांचे सहकार्य लाभले.