महसूल विभागापेक्ष,सेलू पोलीस स्टेशनची पार्किंग हाउसफुल..

सेलू तालुक्यात वाळूचा धक्का कुठेही उपलब्ध नसून वाळू तस्कर हे विनापरवाना अवैध वाळू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची वाळू भरून महसूल बुडवण्याच्या उद्देशाने चोरटी वाळू विक्री करण्याचे आपल्याला दिसून येत आहे. या वाळू चोरटी मुळे नदीपात्राला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. नदी पात्रातून वाळू चि चोरी किती सर्रासपणे चालू आहे हे सर्वसामान्याला दिसून येत असून महसूल विभागाच्या निदर्शनात या गोष्टी येत नाहीत व या अशा चोरट्या वाळू विक्रेत्यांवर महसूल विभागाकडून पहावा तश्या कारवाया आपल्याला पाहायला दिसून येत नाही.!

याउलट सेलू तालुक्यातील होणाऱ्या वाळूच्या तस्करी विरुद्ध महसूल विभागापेक्षा सेलू पोलीस सदैव कार्यरत असताना दिसून येते मागील काही महिन्यापासून सेलू पोलिसांकडून होणाऱ्या वाळू तस्करी विरुद्ध कारवाया या जोराने चालू असून अनेक वाळू तस्करी करणारे वाहन पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशन येथे आणून लावले आहेत. या होणाऱ्या कारवायाच्या वाहनांना पाहता पोलीस स्टेशनमध्ये असणारी पार्किंग ही हाउसफुल झाल्याची पहायला दिसून येते.

सेलू तालुक्यातील महसूल खात्यांचा या वाळू तस्करावर परिणामी कारवाया दिसून येत नाहीत. महसूल विभागापेक्षा पोलीस विभागाच्या होणाऱ्या सातत्याने चालू आहेत परंतु महसूल विभागाचा या वाळू तस्करावर कानाडोळा का होत आहे ? सेलू तालुक्यातील महसूल खाते हे नाम मात्र आहे का,असा प्रश्न पडत आहे ?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button