सेलूतील नूतन विद्यालयात प्रवेशोत्सव जल्लोषात..

सेलू : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सोमवारपासून (१६ जून) उत्साहात सुरू झाल्या आहेत. सेलू येथील नूतन विद्यालयात प्रवेशद्वारातच बॅंड पथकाच्या तालात व लेझीम पथकाने विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रारंभी दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील आदींनी विद्यार्थी तसेच पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शासनाच्या मोफत पाठयपुस्तक वाटप योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा बरडे यांनी केले. उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button