राष्ट्रवादीला मोठे खिंडार सरपंचासह शकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष च्या सरपंच सपना सुनील सावंत, मा. सरपंच सुनील सावंत, युवा नेते विकास गिराम, यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षला सोडचिट्टी देत भारतीय जनता पार्टी मध्ये पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी आरोग्य उपकेंद्र निधी 90 लक्ष,जल जिवन मिशन 1.70 लक्ष,राजवाडी रस्ता पुल 15 लक्ष, ग्रामपंचायत भवन 20 लक्ष, अहिल्याबाई होळकर सभागृह 15 लक्ष, मागासवर्गीय स्मशान भूमी रोड 6 लक्ष अशा विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा पार पडला

तसेच ‘गाव वस्ती’ संपर्क अभियान दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्वच्छता, घरकुल लाभार्थ्यांच्या गाठी भेटी

यावेळी: मा सभापती दिनकर वाघ, मा आरोग्य सभापती अशोक नाना काकडे, भाजप तालुका अध्यक्ष गणेश काटकर, जिल्हा महामंत्री अर्जुन बोरुळ, भागवत दळवे, शिवहरी शेवाळे, दामोदर काकडे, माऊली ताठे,दगडोबा जोगदंड आधी उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button