सामजिक ऐक्याचे संदेश आहेर बोरगाव मस्जिद येथे रोजा इफ्तार चे आयोजन….

सेलू :-प्रतिनिधी
रमजान हा मुस्लिम समाजा साठी पवित्र महिना असून या काळात उपवास (रोजा )धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तार च्या माध्यमातून उपवास सोडला जातो समाजाला बंधू भाव आणि ऐक्य वाढेल या उद्देशाने माजी आ. हरिभाऊ (काका ) लहाने, व सेलू न प चे माजी उपाध्यक्ष श्री संदीप लहाने, आहेर बोरगाव चे सरपंच श्री अभय लहाने गेल्या पंचवीस ते तीस वर्षा पासून पुढाकार घेत इफ्तार पार्टी चे आयोजन मस्जिद मध्ये जाऊन आयोजन करण्यात आले होते दिनांक 28/03/25 शुक्रवारी सायं. आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात एकोप्या चे अदितीय द्रश्य पहायला मिळाले
या कर्यक्रम मध्ये गावातील विविध समजातील मान्यवर उपस्थिती होति सर्वानी मिळून एकत्र इफ्तार केला व सामाजिक एक्याचे दर्शन घडवले या वेळी शिवसेना (शिंदे )लोकसभा समन्व्यक मा आ हरिभाऊ काका लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू मुस्लिम एक्याची गरज आणि त्याचे महत्व यावर भाष्य केले धर्म हा जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही सर्वानी स्लोखा आणि प्रेम असेच ठेवावे असे स्पष्ट केले आहेर बोरगाव हे एक एक्याचे प्रतीक आहे सर्व लोक प्रेमाने वागतात
हा केवळ एक धार्मिक सोहळा नव्हता, तर बंधुत्व, ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक होता.

रमजान हा त्याग, संयम आणि परस्पर प्रेमाचा महिना आहे आणि याच भावनेने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.

धर्म कोणताही असो, प्रेम आणि ऐक्यानेच समाज घडतो! पुढील काळातही अशीच बंधुता आणि सलोखा जपण्यासाठी कटिबद्ध राहूया!
या इफ्तार पार्टी मध्ये मस्जिद मध्ये स्वागत करण्यात आले या वेळी 200हुन अधिक नागरिक सहभागी झाले होते खजूर, फळे, फराळाचे पदार्थ, आणि शीत पेयाचा या मध्ये समावेश होता
यावेळी शेख मुसाभाई, शेख इमाम भाई,शेख अल्लाउद्दीन, शेख खलील भाई, शेख नजमोद्दिन शेख दगडू
शेख सिकंदर, शेख इब्राहिम शेख सलीम ची उपस्थिती होति

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button