ग्रामरोजगार सेवक संघटनेचे सेलू पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन..

प्रतिनिधी, सेलू

सेलू तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ग्रामरोजगार संघटना सेलू. यांच्यावतीने थकीत असलेल्या मानधन मिळवण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती सेलू यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात दिनांक 3 10 2024 रोजी चा शासन निर्णय नुसार सहा महिन्याचे मानधन देण्यात यावे. व मानधन डीबीटी द्वारे मानधन वैयक्तिक खात्यात मिळावे अशी मागणी केली. यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजयराव लहाने, दत्तात्रय तांबे, अनिल डंबाळे, निवृत्ती ढगे, शरद पवार, गणेश सोनवणे, वसंत टाके, बालाजी गजमल, सुरेश मोगल, मुंजा फाटे यांच्यासह सेलू तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button