
सेलू- मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याहस्ते होणार….

सेलू, (प्रतिनिधी) :
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च विभाग यांच्या वतीने २८ व २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याहस्ते होणार आहे.
प्रशालेचा प्रांगणात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम. लोया असणार आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके यांची प्रमुख उपस्थिती राहील.
संस्थेचे उपाध्यक्ष डि. के. देशपांडे, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नूतन कन्या प्रशालेचा प्रांगणात शनिवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्घाटन होणार असून या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नूतन कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.