श्रीकालिकादेवीचा वार्षिकोत्सव उत्साहात..

सेलू : सेलू येथील श्री कालिकादेवी मंदिरात देवीचा वार्षिकोत्सव शुक्रवारी, २७ डिसेंबररोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा झाली. दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसाद झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू कालिकादेवी संस्थानचे अध्यक्ष अशोक कासार होते. याप्रंसगी माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,  कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर, आळंदी येथील ज्ञानेश्वरी पारायण फंडाचे अध्यक्ष अरूणराव वेळापूरे,  शंकरराव हेलसकर, गोपाळराव सासवडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवराज आंदोले, डॉ.श्रीकांत दहिभाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना माजी नगराध्यक्ष बोराडे म्हणाले, की श्री कालिकादेवी मंदिर व सेवाभावी संस्थेच्या वतीने सातत्य ठेवून राबविण्यात येणारे विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रम स्तुत्य आहेेत. माजी आमदार लहाने यांनी मंदिर परिसरात सोयीसुविधा उपलब्ध  व्हाव्यात यासाठी विविध सरकारी योजनेतून भरीव आर्थिक साहाय्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. श्री.भांडेकर म्हणाले, की कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या रूपाने कासार समाजाला एक हक्का आमदार मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून तसेच विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कासार समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करू, असे सागंतिले. या वेळी महाप्रसादाचे यजमान राजश्री व अनंतकुमार विश्वंभर, सेवेकरी लक्ष्मण शेटे, बालाजी वानरे, माधव वानरे, चंद्रकांत सासवडे, धोंडीराम ढोके, मुंजा शेटे, शिवाजी शिनगारे, जीवन खरावणे तसेच विविध संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक वानरे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन हेलसकर यांनी केले. धर्मकुमार वानरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामप्रसाद वराडे, प्रभाकर खरावणे, सुनीता हेलसकर, अरूण गोरे, बाबासाहेब हेलसकर, गोपाळ नामदेव, मीरा हलगे, अरूण ढोके, शरद खरावणे, नितीन वराडे, पंकज ढोके आदींसह पदाधिकारी, सदस्य व कासार समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button