
विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास याला जिम्मेदार कोण.?
प्रतिनिधी सतीश आकात
सेलू शहरात नूतन शाळा रोड असलेल्या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून मोठा खड्डा पडला आहे नूतन विद्यालय शाळेचा समोर हजारो विद्यार्थ्यांचा वावर रस्त्यावरून होत असतो व शहराचा मुख्य रस्ता असल्यामुळे नागरिकांचेही वावर चालूच असतो पण गेल्या आठ दिवसापासून तेथील चेंबरपाशी पडलेला मोठा खड्डा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पावसाळ्याच्या दिवसात शाळेसमोरील भागात प्रचंड प्रमाणात पाणी साचत असते अशावेळी या खड्ड्यात वाहन जाऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता मात्र टाळता येत नाही या ठिकाणी अपघात झाल्यास याला जिम्मेदार कोण हा प्रश्नच पडला आहे…