
दिनांक 20 ऑगस्ट 2024
सेनगाव:-क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय हिंगोली गटसाधन अधिकारी कार्यालय पंचायत समिती सेनगाव व ए. आर. टि. एम. इंग्लिश स्कूल सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरिय शालेय फुटबॉल स्पर्धेत ए आर टि एम इंग्लिश स्कूल ने घवघवीत यश संपादन करत 19 नर्षाआतिल मुले प्रथम व 14 वर्षे आतिल मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील कुमार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रिडा संयोजक सोपान नाईक,प्राध्यापक हेमंत शिंदे यांची उपस्थिति होती.सूत्रसंचालन पुरि सर तर आभार राजेश होडबे यांनी मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून फाहाद शहा, दानिल कुमार व आजिथ सर यांनि कार्य केले. विजयी संघाचे ए आर टि एम इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोष्णीवाल यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या.या संघास क्रिडा शिक्षक संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.