मौजे करजखेडा पुर्नवसित येथील जलसमाधी आंदोलन लेखीपञामूळे तुर्त स्थगित.

प्रतिनिधी | रोहित झोल

सेलू तालूक्यातिल पुर्नवसित गाव करजखेडा येथिल श्री. भाऊसाहेब झोल,राजू हातागळे,राजू झोल व ग्रामस्थांनी गावाला स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण गावाच्या जागेची मोजणी करुन खुणा निश्चित करुन जागेचा ताबा देणे,मारुती मंदिराचा शिल्लक निधी 12% व्याज दराने गावाच्या ट्रस्ष्टच्या बॅक खात्यावर जमा करणे व ईतर मागण्यासाठी वाकडी डॅम मध्ये स्वांतञ्य दिनी 15 आँगष्ट2024 रोजी जलसमाधी घेण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले यावेळी मोठ्या संख्येत महिला व गावकरी उपस्थित होते.जि.प्रशासनातर्फे नायब तहसिलदार श्री.इनामदार,मंडळ अधिकारी, तलाठी ,ग्रामसेवक हजर होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता शेवटी तनाव निर्माण झाल्यामूळे दुपारी अंदाजे 2 वाजता प्रशासनाने लेखी पञाद्वारे 30 सप्टेबर 2024 पर्यत मागण्या पुर्ण केल्या जातील असे कळविले त्यामूळे आदोंलकांनी 30 तारखेपर्यत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जि.प्रशासनास देऊन जलसमाधी घेण्याचे तुर्त स्थगित केले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button