
संदीप शिंदे
फुलंब्री पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्यकुल प्रबोधिनी आयोजित सहविचार सभा २०२४-२५ चे आयोजन श्री संत सावता गुरुकुल, फुलंब्री ता. फुलंब्री जिल्हा. छ. संभाजीनगर याठिकाणी दिनांक २६, २७ व २८ जुलै २०२४ दरम्यान करण्यात आले. प्रस्तुत सहविचार सभेची सुरुवात २६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता झाली. याप्रसंगी बिजभाषक म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव, मा. श्री. निवृत्ती गावंडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, मा. श्री. देवजीभाई पटेल, तर अध्यक्ष म्हणून मा. श्री. सर्जेराव ठोंबरे यांची उपस्थिती लाभली. बोलत असताना श्री गावंडे म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वविचारांना उजाळा देत असताना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आपले ज्ञान कसे पोहचवता येईल याचा विचार व्हावा. तसेच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यात विद्यार्थी विकास, समाज, गाव आणि राष्ट्र विकास पुढे ठेवून आपण काम करावे. ही भूमिका मांडली. यासोबतच वैज्ञानिक दृष्टीची वाढ विध्यार्थ्यांमध्ये कशी वाढविता येईल ज्यामुळे विध्यार्थ्यांची व शिक्षकांची गुणवत्ता व क्षमता वाढेल. व विद्यार्थी संस्कारक्षम बनेल याचा विचार व्हावा. असे मत मांडले. शिक्षकांनी गुणवत्ता अधिष्ठानाची कास धरली पाहिजे. यासोबतच नवोपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप मा. श्री. सर्जेराव ठोंबरे यांनी केला. सर म्हणाले की,
मन, मस्तीष्क आणि मेंदू यांचा विकास होणे म्हणजे सर्वांगीण विकास होणे होय. यासाठी विध्यार्थ्यांचा मैदानी विकास घडवून आणावा लागेल. तसेच कुटुंब संस्कार महत्त्वाचा आहे. त्याकडेही आपले लक्ष असावे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. याचाही विचार आपण करावा. असे मत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे आभार श्री संदेश सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कैलास कुबेर यांनी केले. महाराष्ट्र गीत श्री. ज्ञानेश्वर थोरे यांनी म्हटले. तर पाहुण्यांचा परिचय श्री. अंकुश साळवे यांनी करून दिला.
या सत्राची जबाबदारी स्वामी ब्रम्हानंद विद्यालय, पिंप्री राजा या संस्कार केंद्राने यशस्वीपणे पार पाडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले, संत सावता प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक, श्री अप्पासाहेब चव्हाण व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, श्रीमती, कल्पना उरणकर तसेच या सभेसाठी संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व संस्कार केंद्राचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.