
सेलू / प्रतिनिधी
येथील भा. शि. प्र. संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन (२१जून )साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे.योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.सुदृढ शरीरासाठी योग करणे महत्वाचे आहे.सहशिक्षक अनिल कौसडीकर यांनी सूर्यनमस्कार व योगांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली.विनोद मंडलिक यांनी योगाचे महत्व विशद केले.कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी व मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रागिणी जकाते ,विजय चौधरी ,शंकर राऊत ,दीपाली पवार ,शारदा पुरी ,काशिनाथ पांचाळ ,चेतन नाईक ,चंदू कव्हळे सेवक दत्ता गिरी ,दिगंबर खुळे यांनी प्रयत्न केले.