
परभणी येथील बाळासाहेब जामकर, डॉ.पवन पाटील, प्रा. संतोष सावंत, गणेश माळवे निवड
परभणी:- १९ मे, (क्री. प्र.),
पुणे येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली.
पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमित्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.
परभणी येथील बाळासाहेब जामकर यांची निधी समिती,राज्य सहसचिव डॉ.पवन पाटील,पंच मंडळ प्रा. संतोष सावंत, प्रसिद्ध समिती गणेश माळवे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
पंच मंडळ :
1) सुधाकर राऊळ, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) प्रशांत पाटणकर, मुंबई उपनगर, सचिव, ३) नानासाहेब झांबरे, पुणे, सहसचिव, ४) शरद व्हनकडे, सोलापूर, सदस्य, ५) संदेश आंब्रे, मुंबई उपनगरस, सदस्य, ६) डॉ. रफिक शेख , जालना, सदस्य, ७) किशोर पाटील, ठाणे, सदस्य
८) प्रभाकर काळे, धाराशिव, सदस्य, ९) संतोष सावंत, परभणी, सदस्य, १०) किरण वाघ, पुणे, सदस्य, ११) डॉ. सौ. रत्नराणी कोळी, लातूर, सदस्या

निधी समिती :
१) राजेंद्र महाले, धुळे, कार्यकारी अध्यक्ष, २) अनिल खोचरे, धाराशिव, सचिव, ३) सचिन मुळे, छ. संभाजीनगर, सदस्य, ४) डॉ. समीर शेख, सांगली, सदस्य, ५) बाळासाहेब जामकर, परभणी, सदस्य, ६) यतीन जाधव, रत्नागिरी, सदस्य, ७) डॉ. राजेश सुभेदार, मुंबई उपनगर, सदस्य, ८) सुर्यकांत ठाकूर, रायगड, सदस्य
प्रसिद्धी समिती :
१) अजित संगवे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) राजेश कळंबटे, रत्नागिरी, सचिव, ३) महेश विचारे, मुंबई, सदस्य, ४) भूषण कदम, पुणे, सदस्य, ५) संदीप बल्लाळ, पुणे, सदस्य, ६) दादासाहेब चोरमले, सातारा, सदस्य, ७) प्रेमचंद चौधरी, जळगाव, सदस्य, ८) गणेश माळवे, परभणी, सदस्य.
परभणी जिल्हा खो-खो असोसिएशन वतीने व राज्य खो-खो मार्गदर्शन संजय मुंढे, रणजित जाधव, राम चोखट, डॉ. संतोष कोकीळ, रणजित काकडे, शिवाजी वाघमारे, माणिक कदम
महेश ढोबळे, सागर सुरखे आदी ने अभिनंदन केले.