बोरी कौसडी येथे शांततेत मतदान

कौसडी प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील बोरी व कौसडी परिसरात दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया शांतत पार पडलली. दुपारी बारा ते चार च्या दरम्यान मतदारांनी अतिउणाचा पार असल्यामुळे मतदान करण्यास विलंब केला, सकाळी व सायंकाळी च्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रभाकर वाघीकर माजी उपसभापती विजय खिस्ते माझी पंचायत समिती सदस्य हमीद खान पठाण प्रदीप वाघीकर, हनुमान बोबडे सरपंच नंदकुमार आंभूरे,दीपक अंभुरे सरपंच सुनील खिस्ते माजी सरपंच रमेश ठोंबरे युवा नेते पप्पू डोंबे शिवसेनेचे युवा नेते रवी देशमुख युवा नेते माणिक हारकळ सरपंच संतोष माने यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोरी व कौसडी परिसर अंतर्गत येणाऱ्या सर्वच मतदान केंद्रावर बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी कडे कोर्ट बंदोबस्त लावला होता. या मतदान प्रक्रिया दरम्यान कुठलीही अनुसूचित प्रकार घडले नाही यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली
बोरी येथे ११६८० मतदारांपैकी ६९०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी ५९.११% मतदान शांततेत पार पडले कौसडी येथे सहा हजार ७४ मतदारांपैकी ३८२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या करडी नजर मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.
वर्णा, निवळी खिस्ते, निवळी ठोंबरे,कान्हड, मारवाडी, कुंभारी, जवळा खुर्द, कोक, वाघी या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button