समीर दुधगावकर , सखाराम बोबडे पडेगावकर पंजाब डख किशोर ढगे यांच्या मतदानावर ठरणार परभणीत संजय जाधव, महादेव जानकर यांचे भविष्य..

परभणी | रोहित झोल

प्रचाराला शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या धामधुमीत अपक्ष उमेदवारांनी प्रचारात चांगलीच धावपळ चालवल्याचे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांना पडणाऱ्या मतदानावरच युती आणि आघाडीच्या प्रमुख उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
महाराष्ट्रात मागील दोन-तीन वर्षात झालेल्या राजकीय घडामोडी शेवटी दहा वर्षापासून एका चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान खासदाराचे निवडणूक चिन्ह बदलले. बारामती, माढा या ठिकाणी चाचपणी करून शेवटी जानकर परभणीत दाखल झाले. सुरुवातीला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत आम्हाला स्थानिक उमेदवार द्या किंवा कमळ निशाणीचा उमेदवार द्या अशी मागणी केली होती. पण हे सर्व नाट्य मय घडामोडी पार पडल्यानंतर महादेव जानकर हे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढायची ठरले. प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मात्र अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर, मागील लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेले धनगर समाजाचे सखाराम बोबडे पडेगावकर, वंचित कडून उमेदवारी मिळालेले हवामान अभ्यास पंजाबराव डख, शेतकरी नेते किशोर ढगे यांना किती मते मिळतात यावरून युती आणि आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. समीर दुधगावकर मागील काही वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय होते , जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यातही ते सक्रिय सहभागी होते.त्यामुळे त्यांना मिळणारी मते ही जाणकाराची असतील की मराठा समाजाची येणारा काळच ठरवेल. वंचित कडून उमेदवारी मिळालेले पंजाबराव डख हवामान अभ्यासात असल्याने शेतकरी वर्ग ही त्यांचा चाहता आहे. मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्त्यांनी ही आपली ताकद यांच्या पाठीमागे उभा केल्याची दिसून येत आहे. धनगर आरक्षण अंमलबजावणी लढा, ओबीसी आंदोलन यासह शेतकरी , कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मागील पाच वर्षापासून सतत लढा देत असलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका मात्र महादेव जानकर यांना बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या माध्यमातून बोबडे यांचा सर्व जाती धर्मातील लोकांसोबत थेट संपर्क आलेला आहे. त्यामुळे हे किती मते घेतात यावर महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचे भवितव्य अवलंबून आहे. शेवटच्या टप्प्यात प्रमूख उमेदवाराकडून या अपक्ष उमेदवारांना पाठिंब्यासाठी मनधरणी करण्याची ही शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button