परभणी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी येथे बैठक संपन्न..

परभणी जिल्हयात महामंडळामार्फत परभणी, जिंतूर व गंगाखेड असे तीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे, तेथील स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच परभणी जिल्हयाच्या औद्योगिकीकरणात वाढ करण्याच्यादृष्टीने महामंडळामार्फत एकूण चार ठिकाणी (अति. परभणी टप्पा क्र.1 (मौजे बाभुळगाव व उजळंबा) ता.जि.परभणी, सेलू औद्योगिक क्षेत्र (मौजे-हदगाव खु. पिंप्रुळा व रवळगाव) ता. सेलू, अति. जिंतूर औद्योगिक क्षेत्र (मौजे-कान्हड) ता. सेलू, मौजे पेडगाव-पान्हेरा औद्योगिक क्षेत्र ता.जि.परभणी ) येथे नव्याने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

परभणी जिल्हयाचा औद्योगिक विकास करण्यासाठी शासनस्तरावर निश्चितपणे प्रयत्न केले जातील, उद्योजकांनीही जिल्हयात उद्योग वाढीसाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या उद्योगांबाबतच्या योजनांच्या माध्यमातूनही नवीन उद्योजक तयार होणे आवश्यक आहे. यासाठी नियमितपणे बैठका घेऊन उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील. जिल्हयात टेक्सटाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उद्योगासाठी लागणाऱ्या मुलभूत सोईसुविधा सक्षम केल्या जातील. उद्योजकांना कसल्याही प्रकारे अडचण भासू दिली जाणार नाही.
परभणीचा औद्योगिक विकास व जीडीपी वाढवायचा असेल तर उद्योजकांना जिल्हयात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य पध्दतीने नियोजन करणे गरजेचे आहे. अशा सुचना प्रदीप पेशकार यांनी केल्या
यावेळी उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या बैठकीस परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर भारत सरकारच्या केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योग मंत्रलयाचे (बोर्ड सदस्य) प्रदीप पेशकार, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, परभणीचे अधीक्षक अभियंता आर. के. टेंभुर्णे, जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग, एमसीईडी, जिल्हा लिड बँकेच्या अधिकाऱ्यांसह उद्योग संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button