
सेलू येथे हास्य कवी कुणाल कमरा याने अतिशय घाणेरड्या भाषेत कवितेच्या माध्यमातून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर टीका केलेली आहे.हास्य कविता करण्याच्या नावाखाली अत्यंत नीच व लज्जास्पद टीका या व्यक्तीने शिवसेना गटाचे सर्वोच्च नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर कुणाल कामारा यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यास तात्काळ अटक करण्यात यावे म्हणून दिनांक 28 मार्च 2025 रोजी म्हशीवर कुणाल कामारा यांचे फोटो बॅनर लावून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख पवन घुमरे शिवसेना शहरप्रमुख अजय दळवे युवा सेना शहर प्रमुख कृष्णा भैया वाघे,अर्जुन बावीशे,सोमनाथ गजमल,गोकुळ इंगळे,पप्पू कदम,अक्षय रत्नपारखी बबलू,डूब्बल,निखिल सवणे धोंडीराम शिंदे,योगेश घाडगे