
श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ही शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी प्रसिद्ध आहे. याच यशाची परंपरा पुढे नेत, गौरी श्रीहरी अबुज (वर्ग 6वी) हिने डॉक्टर होमी भाभा ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने प्रथम आणि द्वितीय फेरीत उज्ज्वल यश मिळवून अंतिम मुलाखत व प्रकल्प फेरीसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, स्पर्धा परीक्षा प्रमुख अर्जुन गरुड व संपूर्ण शाळा परिवाराने गौरीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.