साईराज भैया बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2025 मानकरी ठरले गोविंदबाबा वारियर्स..

26 जानेवारी पासून सुरू झालेल्या SPL मध्ये एकूण 8 टीम सहभागी होत्या या मध्ये श्री संत गोविंदबाबा वॉरियर्स व सरपंच एलेवन गुगळी धामणगाव यांच्या मध्ये अंतिम सामना रंगला.
प्रथम फलंदाजी केलेल्या सरपंच एलेवन टीम ने ठेवलेले टार्गेट श्री संत गोविंदबाबा वॉरियर्स ने अतिशय अलगद रित्या पूर्ण करून लीग जिंकण्याचा मान मिळविला त्यांना प्रथम पारितोषिक रु51000 व भव्य 5फूट ट्रॉफी मिळाली व सरपंच एलेवन यांना द्वितीय पारितोषिक रु 21000 व भव्य 4फूट ट्रॉफी देण्यात आली.

सेलू शहरातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या वेळी पूर्ण होताना दिसला.या लीग मध्ये शहरातील जवळपास 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सेलू तालुका खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष श्री, मुकेश भाऊ बोराडे,माजी प्राचार्य शरद कुलकर्णी सर,मा. उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे,श्री व्यंकटेश बापू चव्हाण, निवृत्त क्रीडा शिक्षक श्री नागेश कान्हेकर सर, क्रीडा शिक्षक श्री गणेश माळवे, ह. भ. प. प्रसाद म. काष्टे, राजेंद्र पवार, व्यंकटेश काबरा, वल्लभ जी राठी, राजेंद्र करवा, महेश तोषनीवाल, विलास सोलापुरे, प्रकाश हरकळ आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button