
संपन्न,खेळाडूंना आजपर्यंत च्या सर्वात मोठ्या ट्रॉफी चे आकर्षण.
आज दि.26/01/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत SPL चे उद्घाटन पार पडले,उद्घाटन कार्यक्रम अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रभाकरजी कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.विनोदरावजी बोराडे,प्रभाकरजी सुरवसे,मारोती चव्हाण,मिलिंदजी सावंत, लोकुलवार अण्णा,वहिद अन्सारी,रमेश दौड, कासिम भाई,सचिन कोरडे,सुरेश काळे,व्यंकट बापू चव्हाण,राजेंद्र पवार,प्रकाश पवार,वल्लभ सेठ राठी,लक्ष्मण बोराडे,लक्ष्मण बुरेवार,बबन गायकवाड,बालाजी सरकाळे,जनाआबा सोळंके,सुभाष चव्हाण,सुनील गायकवाड,आप्पू सोळंके,मनोज दीक्षित,संतोष बेंडे,राजू रोडगे आदींची उपस्थिती होती.

पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे साहेबांनी पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला,उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते यामधे डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात सामना खेळवण्यात आला.यावेळी डॉ.असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसिएशनचे श्री संदीप टाक त्यांच्या टीमसह उपस्थित होते,मॅचेस नंतर त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले, नंतर लीग ला सुरुवात करण्यात आली.
या लीग चे प्रथम पारितोषिक रु51000 हजार व भव्य 5 फूट ट्रॉफी व द्वितीय पारितोषिक रु 21000 व भव्य 4 फूट ट्रॉफी विजेत्यांना देणार येणार आहे.
सेलूतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लीग चे आयोजन मित्र मंडळाद्वारे करण्यात येते.