
सेलू नगरपालिकेच्या वतीने फिरत असलेल्या कचरा गाडीच्या माध्यमातून वारंवार जनतेला नळपट्टी व घरपट्टी भरण्याचे आवाहन करत आहेत व तसं न केल्यास थकीत रक्कमेवर दोन टक्के कर वसूल करण्यात येईल अशी ही दक्षता घेण्यात यावी असे सांगण्यात येत आहे पण पण शहरात होणाऱ्या ठिकठिकाणी पाण्याची गळती थांबण्यापासून वारंवार सूचना देऊनही कुठलाही प्रकारची दक्षता न घेता हजारो लिटर पिण्याचे पाणी नाली मध्ये वाया जात आहे सेलूमध्ये बहुतांश भागांमध्ये अजूनही पाण्याची सुविधा झालेली नसून ज्या भागांमध्ये पाणी आहे तेथील पाणी असे नाली मध्ये वाया जात आहे याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे अशा ठिकठिकाणी होणाऱ्या पाण्याचे नुकसानावर नगरपालिकाला कधी जाग येईल असा प्रश्न जनतेच्या मनात पडला आहे