
प्रतिनिधी सतिष आकात
दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅक वर पोल क्रमांक 246/3-2 वर पश्चिमेस रेल्वेच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील युवक नाव राकेश सिंह गोपाल वय 21 वर्ष राहणार करूची पोस्ट शेरूआ, तहसील गंवान,जि.गिरडिह (झारखंड) हल्ली मुक्काम ह देवला पुनर्वसन सेलू येथे राहत होता. सदरील युवक हा मनोरुग्ण असल्या मुळे आजाराच्या गोळ्या संपल्यामुळे तो देवला पुनर्वसन येथून घरून निघून जाऊन सेलू ते जालना जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक वर मनोरुग्णाच्या लहरीत रेल्वे पटरीवरून जात असताना रेल्वेची धडक लागून मरण पावला आहे. अशी खबर सदानंद गोपाल सिंह वय 25 वर्ष याने पोलीस स्टेशन येथे दिली आहे. घटनास्थळी जाऊन सदरील घटनेची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या सांगण्यावरून 48/27 कलम नूसार पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास हवालदार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.