मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बाजार समीचीच्या सचिव व अकाऊंटंट च्या दालनाला लावले न प ने सील

सेलू ( प्रतिनिधी )
येथील बाजार समितीकडे असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी नगर परिषदेने सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनाला नगर परिषदेच्या वतीने आज सील लावण्यात आले आहे .यावेळी उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण ,कर प्रशासक मुस्तजाब खान,उमाकांत बेंदरे, सोमेश्वर भुलंगे,चोबी आदींची उपस्थिती होती .
सेलू नगर परिषदेची येथील बाजार समिती कडे १९९८/९९ पासूनची मालमत्ता कराची थकबाकी ७६,०१ ,६३८ रुपये आहे .याबाबत वारंवार मागणी करून देखील बाजार समितीने या थकबाकीची रक्कम जमा न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत काल संबंधित अधिकाऱ्याची बैठक झाली व त्यामध्ये दि १५/१०/२४ रोजी थकबाकीचा चेक देण्याचे ठरले होते .परंतु याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही व सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे दि १५/१०/२४ मंगळवार रोजी दुपारी नगर परिषदेच्या वतीने बाजार समितीच्या सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनास सील करण्यात आल्याची माहिती उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण यांनी दिली आहे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button