सेलू मोंढा बाजार समितीत सोयाबीन व भुसार मालाच्या लिलावास प्रारंभ..

सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या उपस्थितीत लिलाव..

सेलू (ता. सेलू) :
सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा येथे आज सोयाबीन तसेच इतर भुसार मालाच्या जाहीर लिलावाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

या लिलावप्रसंगी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, संचालक, श्री. सुरेंद्र तोष्णीवाल, ॲड. दत्ताराव कदम, श्री. रामेश्वर राठी, श्री. अनिल बर्डे, सचिव श्री. दीपक शिंगणे, व्यापारी श्री सुरेंद्र सेठ तोष्णीवाल, श्री. द्वारकादास झवर, श्री. ओमप्रकाश तोष्णीवाल, श्री. संतोष सोमानी, श्री. संजय परतानी, श्री. सतीश करवा, श्री. प्रकाश सोमानी, श्री. राजेंद्र प्रसाद मनियार, श्री. सुरेश राठी, श्री. रामेश्वर सोमानी, श्री. सागर करवा, श्री. रामेश्वर साबू, यासह अडत्या, शेतकरी बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सभापती डॉ. संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, *“शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजार समिती सदैव कटिबद्ध आहे. पारदर्शक व प्रामाणिक लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न राहील.”*

लिलावाच्या प्रारंभी श्री. गिरीश बाबासाहेब काकडे (हातनुर) यांना पहिला मान मिळाला.

दरफलकानुसार आजचे भाव पुढीलप्रमाणे होते —

लिलाव प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत होणार आहे या आनंदामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी यावेळी सभापती डॉ. संजय रोडगे यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याची संधी उपलब्ध झाली असून, बाजार समितीच्या पारदर्शक व्यवहारपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button